अखिल गुरव समाजाचे भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम

समाजातील महिलांनी उद्योग व्यवसाय करून स्वबळावर आत्मनिर्भर बनावे.

अहमदनगर : अखिल  गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि  देवस्थान जमीन संदर्भात कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष ऍड .आण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.  नगरमध्ये अखिल गुरव सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रम स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि  देवस्थान जमीन संदर्भात कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये आमदार संग्राम जगताप ,ऍड आण्णासाहेब शिंदे , अखिल गुरव सामाजिक  संघटना, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष  सौ.सुरेखा तोरडमल ,धंनजय दरे ,श्री.मुकुंद आगलावे यांच्या हस्ते नगर जिल्हा गुरव समाज वार्षिक दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी गुरव समाज संघटित होऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाज विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात याबद्दल कौतुक केले.

Also see this and subscribe.

 

 

 

 

 

 

 

 

 

देवस्थान इनाम जमीन संदर्भात ऍड .मुकुंद आगलावे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले आणि  समाज बांधवांच्या अडचणी सोडवल्या.ऍड .आण्णासाहेब शिंदे यांनी समाज बंधुभगिनींना मार्गदर्शन केले. गुरव समाजावर अन्याय झाल्यास समाज संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल असा इशारा आण्णासाहेब शिंदे यांनी राज्य सरकारला दिला. अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष पंकज काळे यांनी उपस्थित महिला भगिनींसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करून महिला भगिनींना बक्षीसे वाटप केले. औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्षा धनश्री तडवळकर आणि  कविताज केक शॉप संचालिका  कविता तरोटे यांनी केक बनवणे बाबत अतिशय छान प्रशिक्षण महिला भगिनींना दिले.समाजातील महिला भगिनींनी गृह उद्योग व व्यवसाय याबाबत माहिती दिली. सुरेखा यांनी सुरू केलेल्या दिक्षा गृहिणी गृह उद्योग अत्यंत कमी कालावधीमध्ये उत्तम प्रगती करून लोकप्रिय होत आहे.समाजातील महिलांनी उद्योग व्यवसाय करून आत्मनिर्भर बनावे असे सुरेखा तोरडमल   यांनी समाज भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले. महिला प्रदेशाध्यक्षा सौ.सुरेखा तोरडमल,महिला जिल्हा अध्यक्षा सौ.स्मिता शेलार ,महिला शहर अध्यक्षा श्रीम.सुवर्णा जावळे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले. या प्रसंगी महिला भगिनींना स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास  सचिन धारूरकर, श्री.धनंजय दरे ,देवस्थान समिती अध्यक्ष  निलेश क्षीरसागर , शिवप्रसाद गुरव , राजेंद्र धुमाळ ,कैलास गुरव ,सुधाकर शिंदे ,पंकज काळे ,योगेश वाघ , रामनाथ जाधव , दादा जाधव ,आदिनाथ शिंदे , उमेश शिर्के , कैलास मल्लनाथ , नरेश  भालेराव , गणेश शिंदे , अरविंद आचार्य , किशोर तोरडमल , प्रशांत शेलार , सुनिल गुरव, श्रीम.सुवर्णा जावळे ,सौ.नलिनी शिंदे, सौ.शोभा जाधव ,सौ.कांचन शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.नलिनी शिंदे  यांनी केले. महेश शिर्के व अनिल तोरडमल यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.