साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान चे आयोजन

साई मंदिरात शेवटच्या गुरुवारनिमित्त भजन संध्या

अहमदनगर ( प्रतिनिधी ) :  साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान संदेशनगर, वसंत टेकडी, अहमदनगर च्या वतीने द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई भजनसंध्या कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन साई भक्तांकडून केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ह्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ही या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या प्रसंगी मकरसंक्रांतीनिमित्त महिलांच्या हळदी- कुंकवाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. या वेळी कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या ५१ डॉक्टरांचा युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या हस्ते  कोरोना गौरव योद्धा सन्मान देऊन गौरव  करण्यात  आला. या प्रसंगी  नगरसेविका शीतल संग्राम जगताप, यांच्या हस्ते साई समाधीचे पूजन आणि आरती करण्यात आली. या वेळी मान्यवरांनी ही आरतीचा लाभ घेतला. साई संघर्ष महिलांच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमप्रसंगी आकर्षक अशी रांगोळी  काढण्यात आली होती. उपस्थित महिलांनी यावेळी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाण दिले. या समारंभासाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Also, see this and subscribe 

 

 

 

 

 

 

 

“एक शाम साई के नाम” कार्यक्रमात  पूजा गडकरी, श्रीकांत गडकरी, श्रीकांत राऊत,यांच्या आर्केस्ट्रा ने श्रवणीय अशी साई भजने, भक्तिगीतांनी मंदिर परिसर भक्तिमय केला. यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी उपस्थित साई भक्तांचे आभार मानले.  सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे,यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी,  साई संघर्ष नगरसेविका शीतल संग्राम जगताप, १०८ ऍम्ब्युलन्स बीव्हीजी  जिल्हाध्यक्ष कांचन बिडवे,  नगरसेवक सुनील त्र्यंबके, सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे, नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, नगरसेविका सीमा त्र्यंबके,  नगरसेविका संध्या पवार , नगरसेविका रुपाली वारे, स्वाती पवळे, वनिता बिडवे,  कांता बोठे, अनुजा कांबळे, कमल गायकवाड, पुष्पा राऊत,, अनिल निकम. आदी उपस्थित होते . 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.