मुंबई :
बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे. करोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना करोनाचा फटका बसला आहे. मात्र अशातही अक्षयने आपली कमाई जोरदार सुरू ठेवत मानधनात आणखी वाढ केली आहे.
काही दिवसांपूर्वी अक्षयने त्याच्या मानधनाची रक्कम ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे. विशेष म्हणजे, अक्षय त्याचा खास मित्र व निर्माता फिरोज नाडियादवाला याला मानधनात विशेष सूट देत असल्याची चर्चा आहे. फक्त फिरोजसोबत काम करताना अक्षय त्याचं मानधन कमी करतो असं म्हटलं जातं आहे.