नगरच्या स्नेहा देशमुख यांनी झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्वीन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद मिळवलं आहे. रविवारी संध्याकाळी या महास्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडलाय . यात देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून नगरच्या इतिहासात मनाचा तुरा रोवलाय .तिला एक लाख रुपयांचा धनादेश तसेच नामांकित कंपन्यांचे गिफ्ट व्हाउचर्स मिळालेत.
वजनदार डान्सिंग क्वीन स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आदी शहरातील मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, सप्टेंबर पासून १३ आठवडे हि स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत प्रत्येक फेरीत वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करत स्नेहा देशमुख यांनी परीक्षकांची वाहवा मिळवलीय आणि त्या शेवटच्या ६ स्पर्धकांमध्ये पोह्चल्यात . २७ डिसेम्बरच्या महाअंतिम सोहळ्यात हि त्यांनी एकदम तडकडार सादरीकरण केलय. स्पर्धेचे किंग कोरिओग्राफर ओंकार शिंदे यांनी यांच्याकडून तिला बहुमोल मार्गदर्शन मिळाल होत, स्पर्धेच्या परीक्षक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का यांनी वेळोवेळी त्यांच्या नृत्याविष्कारांना दाद दिलीय