यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं’, हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या अनिकेत साठे याने. नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. अनिकेतच्या लेफ्टनंट पदावरील नियुक्तीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळवलं आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांचे वडिल अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते. तरीही ते खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
