कवयित्री शर्मिला गोसावी यांना ‘अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला’ पुरस्कार प्रदान
महिलांचे प्रश्न, समस्या, भाव भावनांचे हिंदोळे नव्या साहित्यातून यायला हवे - शर्मिला गोसावी
ऋषिकेश राऊत –
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी बरोबरच साहित्यिक कार्यात शब्दगंधचे योगदान मोठे असुन चळवळीच्या संस्थापक सदस्या म्हणुन शर्मिला गोसावी यांचे कार्य विस्तारत जाणारे आहे, त्यामुळेच त्यांचा गौरव करतांना आनंद होत आहे, असे मत अभिनव खान्देश परिवाराचे प्रभाकर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
धुळे येथील कै.सौ.नलिनी सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शर्मिला गोसावी यांना अहमदनगरमधील निवासस्थानी पुरस्कार प्रदान करतांना सुर्यवंशी बोलत होते. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्व
भुमीवर एकत्रीत जाहीर कार्यक्रम न घेता ज्यांना पुरस्कार जाहिर करण्यात आले,
डॉ.गुंफा कोकाटे, स्वाती राजेभोसले, रिताताई जाधव, सरोज आल्हाट ,वृंदा कुलकर्णी, सविता दरेकर, सुनीता बहिरट, ज्योत्स्ना डासाळकर या सर्वांना त्यांच्या निवासस्थानी ‘अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार-२०२१ं देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रभाकर सुर्यवंशी म्हणाले कि, अहमदनगर मधील साहित्यिक वातावरण सुसंस्कृत ठेवण्यामध्ये शर्मिला गोसावी यांचा महत्वाचा वाटा आहे. त्या श्री.साई इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून शब्दगंध साहित्यिक परिषदच्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांची बांगड्यांची खैरात, नजराणा, मनमीत हि पुस्तके प्रकाशित असून ‘वन्स मोअर’ मराठी कविता व ‘मनातला पाऊस’चे त्यांनी संपादन केलेले आहे. चौदा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर, पुणे वर ११ वेळा कविता वाचन केले आहे. उत्कृष्ट निवेदिका म्हणून २८९ कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले असून त्या शब्दगंध प्रकाशन’च्या संचालिका असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीने त्यांची निवड केली आहे. येथे आल्यानंतर त्यांचे कार्य पाहुन समाधान वाटले.
यावेळी राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रु.२००० ची ग्रंथसंपदा शर्मिला व सुनील गोसावी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली.
शर्मिला गोसावी आपल्या मनोगतात म्हणाल्या कि, ‘अभिनव खान्देश परिवार’ हे साहित्यातील एक कुटुंब असुन या कुटुंबातील खानदेश मधील जेष्ठ सदस्यांनी दिलेली ही शाब्बासकीची थाप आहे. या पुरस्काराचा नम्रपणे मी स्विकार करून तमाम महिला भगिनींना लेखनरुपाने व्यक्त होण्याचे मी आवाहन करते. महिलांचे प्रश्न, समस्या, भाव भावनांचे हिंदोळे नव्या साहित्यातून यायला हवे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया.
अचानक झालेल्या या घरपोहोच पुरस्कार वितरण समारंभास प्रा.बबनराव गिरी, मारुती सावंत, मकरंद घोडके आदि मान्यवर उपस्थित होते. सुनील गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.