बंदिश प्रस्तुत… स्वरगंध! शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतप्रेमींनो, तुमच्यासाठी एक संगीतमय संधी! मुग्धा भट-सामंत यांची सुरेल मैफिल –
बंदिश प्रस्तुत… स्वरगंध!
बंदिश प्रस्तुत… स्वरगंध!
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतप्रेमींनो, तुमच्यासाठी एक संगीतमय संधी!
मुग्धा भट-सामंत यांची सुरेल मैफिल –
रविवार, २२ जून
सायं. ६ वा.
रावसाहेब पटवर्धन सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
पुण्याच्या मूळ रहिवासी, सध्या रत्नागिरीत स्थायिक असलेल्या मुग्धा ताईंनी विना सहस्रबुद्धे, पद्मा तळवलकर, पं. विकास कशाळकर यांच्याकडून संगीताची गोड शिदोरी घेतली आहे.
त्यांचं गायन म्हणजे शास्त्रीय संगीताची खरी अनुभूती – त्यात नाट्यसंगीत, अभंग, उपशास्त्रीय गाण्यांचीही रंगत!
साथसंगत:
मकरंद खरवंडीकर – हार्मोनियम
शेखर दरवडे – तबला
एंट्री फ्री आहे!
म्हणजे संगीताची पर्वणी – तीही मोफत!
हा कार्यक्रम ‘बंदिश’ तर्फे आयोजित असून डॉ. धनश्री खरवंडीकर, अविनाश देऊळगावकर, सुमेधा देशपांडे, अविनाश बोपार्डीकर आणि अनुजा कुलकर्णी यांचे विशेष प्रयत्न आहेत.
मित्रांना टॅग करा, पोस्ट शेअर करा आणि रविवारचं संध्याकाळचं नियोजन निश्चित करा – स्वरगंध मैफिलीसाठी!