देशभरातील तब्बल ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द झाली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे.
राजकीय पटलावर या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पण एवढंच नाही…
Share
निवडणूक आयोगाचा मोठा बॉम्ब!
देशभरातील तब्बल ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द झाली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे.
राजकीय पटलावर या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पण एवढंच नाही… आपल्या शहरात अजून एक भलतंच धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे!
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी डिमांड – आणि लाचलुचपत विभागाचा जबरदस्त सापळा!
एका तक्रारदाराने आपल्या १९ वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. पण महिनोन्महिने अर्ज प्रलंबित राहिला. चिंतेत असलेल्या या तक्रारदाराला “श्रीसाई सायबर कॅफे”च्या कर्मचाऱ्याने एका खाजगी महिलेचा नंबर दिला.
त्या महिलेने थेट सांगितलं – “प्रमाणपत्र हवंय तर २०,००० रुपये द्या, ते पैसे ऑफिसमधल्या अधिकारी-कर्मचार्यांसाठी आहेत!”
तक्रारदाराने हे ऐकून धक्का बसला आणि थेट एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कडे तक्रार केली.
व्हॉइस रेकॉर्डरमधून पुरावे
पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने संपूर्ण पडताळणी केली. नोबेल हॉस्पिटल रॉयल हॉटेल इतर ठिकाणी झालेल्या मिटिंगमध्ये
महिलेची पैशांची मागणी रेकॉर्ड झाली.
शेवटी डील ₹20,000 वरून ₹18,000 वर आली.
महिलेने सांगितलं – “वरून प्रेशर आहे… पण लगेच काम करून देते!”
एसीबीचा मास्टरस्ट्रोक!
लाचलुचपत विभागाने आखला भन्नाट सापळा: 9,500 रुपयांच्या खर्या नोटा 8,500 रुपयांच्या बनावट नोटा त्यावर खास पावडर लावली
तक्रारदाराने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत सिटी प्राईड हॉटेलजवळ त्या महिलेला पैसे दिले. जागा होती – जुना पिंपळगाव रोड, चेतन हॉस्पिटल रोड
पैसे हातात घेताच एसीबीच्या पथकाने त्या महिलेचा खेळ खल्लास केला!
कोण आहे ही महिला?
आरोपीचं नाव आहे – उषा मंगेश भिंगारदिवे
(वय ३३, रा. प्लॉट नं. १०३, श्रीनाथ कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक)
ती सरकारी कर्मचारी नसून खाजगी महिला आहे. तरीसुद्धा, तीने जात पडताळणी कार्यालयातील १०-१५ जणांसाठी पैसे मागितल्याचं कबूल केलं आहे.
दोन मोठे धक्के एकाच दिवशी!
निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली – महाराष्ट्रातील ४४ पक्ष गेला! आपल्या शहरातच जात पडताळणी प्रमाणपत्राच्या नावाखाली १८ हजारांची लाच स्वीकारताना महिला रंगेहाथ पकडली!
प्रश्न आता असा आहे –
साध्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी जर एवढं भ्रष्टाचाराचं जाळं असेल, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?
पण एसीबीच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा लोकांचा विश्वास परत मिळतोय की “भ्रष्टाचार कुठेही असो, एसीबीच्या जाळ्यातून सुटणं अशक्य आहे!”
Metro News चा आवाज:
भ्रष्टाचार थांबला पाहिजे.
सिस्टम पारदर्शक झाली पाहिजे.
आणि यासाठी अशी धडक कारवाई सातत्याने व्हायला हवी.
तुमचं मत काय? लाच घेणाऱ्यांना मोठी शिक्षा व्हायला हवी का? की सिस्टीम सुधारल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत?
कॉमेंटमध्ये लिहा तुमचं मत
आणि पोलिसांच्या या धाडसी कारवाईला सलाम करा