BIG RELIEF FOR FARMERS | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा ठरला आहे!
Share
BIG RELIEF FOR FARMERS | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा ठरला आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तब्बल ₹1932.72 कोटींचा निधी मंजूर केला आहे!
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव या हप्त्याची वाट पाहत होते. कारण, ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. पण नमो योजनेचा हप्ता मात्र उशीराने मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला होता. काही ठिकाणी तर ही योजना बंद झाली का? अशी चर्चा सुरू होती.
पण आता 3 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने अधिकृत शासन निर्णय जारी करत हा संभ्रम दूर केला आहे.
याचा थेट फायदा राज्यातील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच ₹2000 जमा होणार आहेत.
या निर्णयातील महत्वाचे मुद्दे: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आतापर्यंत 6 हप्ते मिळाले आहेत. या 6 हप्त्यांमधून शेतकऱ्यांना एकूण ₹12,000 मिळाले आहेत. आता सातव्या हप्त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार निधीची मागणी केली होती, आणि ती मागणी मान्य झाली आहे.
शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर धडाक्यात दिसत आहेत – “आता खरी दिवाळी आली! सरकारने योग्य वेळी दिलासा दिला.” “इतका उशीर का झाला याचं उत्तर सरकारने द्यायला हवं!” “शेतकऱ्यांसाठी सतत निधी वेळेवर मिळावा, हीच खरी अपेक्षा.”
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. केंद्र आणि राज्याच्या एकत्रित योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी हजारो रुपये जमा होतात. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असला तरी, वेळेवर निधी मिळणं हीच खरी शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी गूड न्यूज आहे – सातवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात!