BIG UPDATE! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती | दिवाळीनंतर होणार ‘महामुकाबला’?
50 लाखांहून अधिक मतदार, 4,982 मतदान केंद्रे आणि 17 हजारांपेक्षा जास्त ईव्हीएम यंत्रांची तयारी सध्या सुरू आहे.

| दिवाळीनंतर होणार ‘महामुकाबला’?
नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांविषयी अखेर मोठी अपडेट आली आहे!
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिकमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली महत्वाची माहिती 
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आयोग अलर्ट झाला असून, निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखला जाणार आहे.
50 लाखांहून अधिक मतदार, 4,982 मतदान केंद्रे आणि 17 हजारांपेक्षा जास्त ईव्हीएम यंत्रांची तयारी सध्या सुरू आहे.
यासाठी 8,705 कंट्रोल युनिट्स लागणार आहेत – वाघमारे यांनी स्पष्ट केलं!
निवडणुकीचा टप्पा ठरला नाही, पण…
वाघमारे म्हणाले, “सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाचा मोठा ताण येईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार, हे अजून निश्चित नाही.” 
प्रभाग रचना 2011 च्या जनगणनेनुसारच राहणार असून, OBC आरक्षणासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे.
1 जुलैपर्यंत मतदार यादीत असलेले नाव हेच गृहीत धरून मतदार ठरणार आहेत.
व्हीव्हीपॅट नाही वापरणार!
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्र वापरणार नाहीत. कारण त्यामध्ये वेळ जास्त जातो आणि अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो – अशी माहिती वाघमारे यांनी दिली 

भविष्यात जर प्रक्रिया बदलली, तर व्हीव्हीपॅटविषयीचा निर्णय पुन्हा घेण्यात येईल असंही ते म्हणाले.
दिवाळीनंतर लागणार निवडणुकीचा बिगुल?
सध्या निवडणुकीची अचूक तारीख जाहीर झालेली नसली तरी, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुक आणि राजकीय पक्षांनी आता कंबर कसली पाहिजे! 

तरुण मतदारांनो, अपडेटसाठी फॉलो करा
@MetroPortalLive
#निवडणुका2025 #स्थानिकस्वराज्यसंस्था #महानगरपालिका #ZP #MetroBreaking #ElectionBuzz #YouthVotesMatter #नाशिकन्यूज 
