अंजर अन्वर खान यांची एम.आय.एम. महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड
Share
BIG UPDATE | नगरचा तरुण राज्य पातळीवर झळकला!
अंजर अन्वर खान यांची एम.आय.एम. महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड
नगरकरांसाठी अभिमानाची बातमी!
शहरातील तरुण नेते अंजर अन्वर खान यांना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
ही घोषणा स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रमुख, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते करण्यात आली.
इम्तियाज जलील यांनी त्यांच्या अधिकृत Twitter (X) अकाउंटवरून अभिनंदन करत सांगितले की “अंजर खान यांचे युवकांमध्ये मजबूत नेटवर्क आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांचे संघटन आणखी बळकट होणार आहे.”
अल्पसंख्यांक युवकांचे आवाज बनणार अंजर खान!
बेरोजगारी, शिक्षण, सामाजिक न्याय, राजकीय हक्क – या मुद्द्यांवर युवकांचे नेतृत्व करणे हीच खरी जबाबदारी असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. “युवकांचे प्रश्न फक्त भाषणांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून सोडवले जातील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. आगामी काळात संपूर्ण जिल्हा आणि राज्यभर युवकांचे सशक्त व प्रभावी संघटन उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
लवकरच होणार युवकांचे मेळावे!
नगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या मेळाव्यांद्वारे तरुणांना पक्षाशी जोडून राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याची रणनीती आखण्यात येत आहे.
या नियुक्तीनंतर अंजर अन्वर खान यांचे नगरसह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नगरकरांसाठी ही फक्त बातमी नाही तर राज्य पातळीवर आपला तरुण पुढे जात असल्याचा अभिमानाचा क्षण आहे.
चला, ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!