“काळी राखी” आंदोलन – सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांचा संदेश! 

दररोज महाराष्ट्रात 10-15 शेतकरी आत्महत्या आजवर 6 लाख शेतकरी जीवन संपवून गेले…

🔥
 “काळी राखी” आंदोलन – सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांचा संदेश! 🖤🌾

जामखेड/चौंडी : रक्षाबंधनाचा दिवस… पण चौंडीमध्ये राखी नव्हती रंगीबेरंगी 🎀, तर होती वेदनांची राखी 🖤! प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मुखवट्यांना विधवा व निराधार महिलांकडून काळी राखी बांधून सरकारचा निषेध केला.

📌 कारण?
दररोज महाराष्ट्रात 10-15 शेतकरी आत्महत्या 💔
आजवर 6 लाख शेतकरी जीवन संपवून गेले…
पण कर्जमाफी अजूनही स्वप्नच!

💬 बच्चू कडूंचा संदेश :
“ही राखी नव्हे, हा वेदनांचा धागा आहे. कर्जमाफी हा विषय कोणत्याही एका जाती-धर्माचा नसून, राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.”

🤝 आंदोलनात उपस्थित –
प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जयसिंग उगले, नय्युम सुभेदार, सुदाम निकत, राम शिदोरे, लक्ष्मी देशमुख, राहुल भालेराव, तुकाराम शिंगटे, सुनील लोंढे, डॉ. कारंडे, विकास मासाळ, बंडू उगले, बबन घायतडक आणि अनेक कार्यकर्ते.

⚡ कडूंची टोलेबाजी :

  • “शक्तीपीठ महामार्गासाठी 80 हजार कोटी मिळतात, पण शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.”
  • “बहिणींना पैसे द्यायचे, भावाला लुटायचं – हे सरकार करतं.”
  • “अपंगांचे पगार 4-4 महिने थांबतात, पण आमदार-खासदारांचे पगार थांबत नाहीत.”
  • “अहिल्यादेवी होळकर यांनी जे राज्य चालवलं, ते आजच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना चालवता येतं का?”

😔 आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंतही बच्चू कडूंनी व्यक्त केली, पण लढा थांबणार नाही असंही स्पष्ट केलं.

📢 नव्या पिढीचा मेसेज :
शेतकऱ्यांचा आवाज फक्त पोस्ट-स्टेटसपुरता नको 🚫📱
राखी काळी झाली, पण शेतकऱ्यांचं भविष्य उजळलं पाहिजे! 🌾✊

 

#KaliRakhi #BacchuKadu #FarmersProtest #LoanWaiver #MaharashtraPolitics #Chaundi #MetroNews