BMC कडून फक्त 5 युनियनसोबत करार? बाकीच्या सफाई कामगारांवर अन्याय – कामगार संघटनांचा सवाल!

कामगारांची मागणी स्पष्ट आहे – सर्व युनियनच्या कामगारांना न्याय द्या, सर्वांना कायम करा, अन्यथा मनपाच्या मुख्यालयात आंदोलन अटळ आहे!

BMC कडून फक्त 5 युनियनसोबत करार? बाकीच्या सफाई कामगारांवर अन्याय – कामगार संघटनांचा सवाल!

मुंबईच्या रस्त्यांची स्वच्छता राखणारे हजारो सफाई कामगार गेली 10-15 वर्षं घाणीत काम करत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळावा यासाठी 24 वॉर्डांमध्ये विविध कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात केस दाखल केल्या असतानाही, BMC प्रशासनाने फक्त 5 युनियनसोबतच 28 जुलै 2025 रोजी करार केला, ही बाब संतापजनक आहे, असं म्हणत कामगार संघटनांनी बंड पुकारलं आहे.

अखिल भारतीय कामगार एकता संघ आणि राष्ट्रीय मजदूर परिषद यांच्या नेतृत्वाखालील या संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बाकीच्या कामगारांवर अन्याय झाला, तर आम्ही BMC मुख्यालयासमोर सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबांसह उपोषण करणार आहोत. त्याची पूर्ण जबाबदारी BMC आयुक्तांवर असेल, असं अध्यक्ष नितेश हिरा शिप्रे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मुख्य मुद्दे:

  • फक्त 5 युनियनसोबतच का करार?
  • 24 वॉर्डांमध्ये विविध संघटनांनी न्यायालयात केस दाखल केल्या आहेत.
  • अनेक कामगार 10-15 वर्षांपासून सेवा देत आहेत, तरीही कायम होत नाहीत.
  • BMC आयुक्त अन्याय करत असल्याचा आरोप.
  • 29 जुलै 2025 रोजी BMC आयुक्तांना निवेदन सादर.

कामगारांची मागणी स्पष्ट आहे – सर्व युनियनच्या कामगारांना न्याय द्या, सर्वांना कायम करा, अन्यथा मनपाच्या मुख्यालयात आंदोलन अटळ आहे!

 

📢
#BMCProtest #SafaiKarmachariJustice #MumbaiWorkersRights #BMCUnfairDeal #MetroPortalExclusive