दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी! मिळवा ₹1.5 लाख अनुदान आणि सुरू करा माती परीक्षण प्रयोगशाळा

रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलंय.

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी! मिळवा ₹1.5 लाख अनुदान आणि सुरू करा माती परीक्षण प्रयोगशाळा

💼
🌱

Gen Z साठी खास गुडन्यूज! आता दहावी पास युवक-युवतींसाठी आहे जबरदस्त स्कीम – मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारण्याची संधी! सरकार देतंय थेट ₹1.5 लाख अनुदान, सोबतच लॅब उभारणाऱ्या पहिल्या 300 माती नमुन्यांसाठी मिळणार ₹300 प्रती नमुना बोनस रिवॉर्ड! 🧪💰

📌 कशासाठी हे सगळं?
रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलंय. माती परीक्षण केल्याशिवाय शेतीत भरघोस उत्पादन शक्य नाही. म्हणूनच 2025-26 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ‘ग्रामस्तरीय मृदा परीक्षण लॅब’ योजना सुरू झालीये.

✅ पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण (Sci + Computer नॉलेज असलेले प्राधान्य)
  • वय: 18 ते 27 वर्ष
  • शेतकरी उत्पादक संस्था, कृषी क्लिनिक, माजी सैनिक, बचत गट, खत विक्रेते, शाळा-महाविद्यालयांनाही संधी

🏢 लॅबसाठी जागा:
किमान 4 वर्ष भाडे करार / स्वतःची मालकी असलेली जागा आवश्यक

📬 अर्ज पाठवायचा कुठे?
📍 कृषी भवन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडकरी चौक, नाशिक
📧 Email: [email protected]
🗓️ शेवटची तारीख: 5 ऑगस्ट 2025

📣 तुमच्या गावातही उभारा “माती चाचणी लॅब” आणि बना स्वावलंबी उद्योजक!

#SoilTestingLab #StartupForYouth #GenZBusiness #GovtGrant #MaharashtraAgriculture #मातीचंआरोग्य #SelfEmployment #मनगटातदम #AgriEntrepreneur #MetroPortal