BMS चा 70वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – शनिवार वाडा ते S.P. कॉलेजपर्यंत मोटारसायकल रॅली, कामगार मेळाव्यात ठणाणा!

रॅलीत शेकडो BMS कार्यकर्त्यांचा सहभाग

BMS चा 70वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – शनिवार वाडा ते S.P. कॉलेजपर्यंत मोटारसायकल रॅली, कामगार मेळाव्यात ठणाणा!

देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघ (BMS) ने 70वा वर्धापन दिन पुण्यात धडाक्यात साजरा केला! बुधवार, 23 जुलै 2025 रोजी शनिवार वाडा ते S.P. कॉलेज दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली निघाली आणि संध्याकाळी लेडी रमाबाई हॉलमध्ये जबरदस्त कामगार मेळावा पार पडला.

कार्यक्रमाचे हायलाईट्स:

➡️
रॅलीत शेकडो BMS कार्यकर्त्यांचा सहभाग
➡️ अध्यक्षीय भाषण: अर्जुन चव्हाण (पुणे जिल्हाध्यक्ष)
➡️ कामाचा आढावा: सागर पवार (जिल्हा सचिव)
➡️ मार्गदर्शन: संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ

भुजबळ यांनी ठामपणे सांगितले:

“BMS गावागावात पोहोचणार! असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांपर्यंत सरकारी योजनांचा फायदा मिळवून देणार!”

कामगारांसाठी महत्त्वाच्या मागण्या:
🔹 वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड तातडीने लागू करा
🔹 EPF-95 पेन्शनधारकांना ₹5,000 + महागाई भत्ता मिळावा
🔹 ESIC हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा
🔹 कामगारांसाठी ₹4,000 मासिक वैद्यकीय निधी
🔹 8वा वेतन आयोग स्थापन करा
🔹 अंगणवाडी, आशा वर्कर्सना सरकारी सेवेत घ्या व पेन्शन लागू करा

कार्यक्रमात उपस्थित क्षेत्र:
🏭 बँक, शिक्षण, संरक्षण, मेट्रो, वीज, महापालिका, बीडी, इंडस्ट्रीज, घरेलू, खासगी हॉस्पिटलमधील कामगार

“मेरा घर BMS घर” अभियानाचे दृश्य झळकले:
सर्व सभासदांनी आपल्या घरावर BMS चा झेंडा फडकावला!

सचिन मेंगाळे (सरचिटणीस, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ) म्हणाले:

“या उपक्रमांमधून BMS च्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडले आहे. आता कामगारांची प्रतिष्ठा आणि हक्क यासाठी निर्णायक लढा सुरू होणार!”

 

सूत्रसंचालन: विवेक ठकार
आभार प्रदर्शन: बाळासाहेब पाटील