पारनेरच्या ५४ गावांसाठी आनंदाची बातमी – डोंगरी विभागात समावेश, आता मिळणार शिक्षण व नोकरीत विशेष सवलती! 

उपसचिव नि. भा. खेडकर यांनी १३ मार्च २०२४ रोजी यासंदर्भातील सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे.

📢
 पारनेरच्या ५४ गावांसाठी आनंदाची बातमी – डोंगरी विभागात समावेश, आता मिळणार शिक्षण व नोकरीत विशेष सवलती! 🙌

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पारनेर तालुक्यातील ५४ गावांचा समावेश डोंगरी विभाग विकास योजनेत करण्यात आला आहे. उपसचिव नि. भा. खेडकर यांनी १३ मार्च २०२४ रोजी यासंदर्भातील सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे.

📝 फायदे काय?
या गावांतील नागरिकांना आता डोंगरी दाखला मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्येही प्राधान्य मिळणार आहे.

🏞️ यादीतील काही गावं:
भोंद्रे, ढोकी, पिंपरी गवळी, राळेगण सिद्धी, पठारवाडी, वाळवणे, पुणेवाडी, कळस सावरगाव, तिखोल, गोरेगाव, डोंगरवाडी, पोखरी, गारखिंडी, शेरी कोलदरा अशा एकूण ५४ गावांचा समावेश यामध्ये आहे.

 

🎓 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने हा निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून, यामुळे गावांचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे