पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा धाडसी हल्ला!

सोने, चांदीचे दागिने आणि रोख लंपास

🚨
पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा धाडसी हल्ला!

अहिल्यानगरमध्ये घरफोडी – सोने, चांदीचे दागिने आणि रोख लंपास 💰

अहिल्यानगर : शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाड टाकत पोलिसांच्या घरावरच हात साफ केला आहे. केडगाव-लिंकरोड परिसरात राहणारे पुण्यातील शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष बुधवंत (वय 38) यांच्या घरात चोरीची ही घटना घडली.

📅 घटना कशी घडली?
16 ऑगस्ट रोजी बुधवंत हे ड्युटीवर पुण्यात होते. त्यांची पत्नी अर्चना, आई मंदाबाई आणि मुलं रक्षाबंधनासाठी मूळगावी पाथर्डीला गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्टच्या सायंकाळी अर्चना परत आल्या तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आणि आतमध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून त्या थक्क झाल्या.

त्यांनी तात्काळ संतोष यांना संपर्क करून डायल 112 वर माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता बेडरूममधील कपाटाचे लॉकर फोडून चोरी केल्याचे उघड झाले.

💰 चोरट्यांचा मालामाल डाव –

  • 20 ग्रॅमचे मंगळसूत्र

  • 5 ग्रॅमची अंगठी

  • 3 ग्रॅमची चैन

  • 2 ग्रॅमचे कानातले

  • चांदीच्या पाच अंगठ्या, दोन ब्रासलेट, चार जाडव्या, पैंजण

  • रोख 16 हजार रुपये

एकूण अंदाजे ₹62,500 किमतीचे दागिने आणि रोख चोरट्यांनी लंपास केले आहेत.

🔍 पोलिसांचा तपास सुरू
बुधवंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

⚠️ सतत वाढणाऱ्या घरफोड्यांनी नागरीक चिंतेत
शहरात सलग घडणाऱ्या अशा घटनांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांच्या घरावरच जर अशी चोरी होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित, असा सवाल नागरिकांतून होत आहे.