केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

१ हजार ३१३ अग्नि कुंड चा विक्रम केल्याने रेकॉर्डचे प्रमाणपत्र मठाधिपती अशोक दादा जाधव यांना सुपूर्त!

अहिल्यानगर – केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाच्या वतीने मठाधिपती अशोक दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री. दत्त महायाग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त अग्नि कुंडाचा विक्रम केला १७ नोव्हेंबर २०२४ रोजी या यज्ञामध्ये एकूण १ हजार ३१३ अग्नि कुंड (हवन कुंड) वापरण्यात आले असून याची रेकॉर्ड नोंद करण्यात आली आहे मोठ्या उत्साहात १ हजार ३१३ यजमानांच्या हस्ते श्री दत्त महायागाचे आयोजन केले होते त्यामध्ये १३ हजार भाविक उपस्थित होते व या महायागाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती. त्याचे प्रमाणपत्र आज महाशिवरात्रीच्या दिवशी देण्यात आले हे प्रमाणपत्र व मेडेल नॅशनल रेकॉर्ड बुक चे निर्णायक अशोक अडक यांच्या हस्ते मठाधिपती अशोक दादा जाधव यांना सुपूर्त करण्यात आले यावेळी मठाचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महायागाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. व मठाच्या वतीने  सद्गुरू  शंकर महाराज जयंती व, दत्त जयंती उत्सव तसेच धार्मिक उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात  साजरे करण्यात येतात. श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाची रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून या रेकॉर्डचा महाराष्ट्र भर सर्वत्र अभिनंदन होत आहे.