BREAKING | शिवसेना (शिंदे गट)चा ठराविक डाव!
अहिल्यानगरच्या मध्यवस्तीत अण्णाभाऊ साठेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी –
BREAKING | शिवसेना (शिंदे गट)चा ठराविक डाव!
अहिल्यानगरच्या मध्यवस्तीत अण्णाभाऊ साठेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी – सक्कर चौक सुचवला, प्रस्ताव थेट उपमुख्यमंत्र्यांकडे!
अहिल्यानगर | 4 ऑगस्ट
अहिल्यानगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी जोर धरतेय! शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख सचिन जाधव यांनी महापालिका आयुक्त श्री. डांगे यांना दिलेल्या निवेदनात, सक्कर चौक किंवा महानगरपालिकेच्या जागेवर साठेंचा स्मारक व्हावं, अशी आग्रही मागणी केली आहे.
जुना लालटाकीतील अर्धाकृती पुतळा असूनही, तो पुरेसा नाही – नव्या पिढीपर्यंत साठेंचा विचार पोहोचवायचा असेल, तर पूर्णाकृती, भव्यदिव्य स्मारकाची गरज आहे, असं जाधव यांनी ठामपणे सांगितलं.
विशेष बाब म्हणजे, या पुतळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यामुळे निधी आणि निर्णय या दोन्ही बाबतीत मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.
या निवेदनावेळी अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते:
जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे
माजी महापौर संजय शेंडगे
माजी नगरसेवक सचिन शिंदे
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे
महेश भोसले, गणेश वाघचौरे, अशोक दहिफळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध घटकांनी देखील या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिला आहे!
मेट्रो न्यूज कमेंट बॉक्समध्ये सांगा –
