ब्रेकिंग! भंडारदरा धरण फुल टँक – प्रवरेत १२,९२१ क्युसेकचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी मानलं जाणारं भंडारदरा धरण बुधवारी (२० ऑगस्ट) पहाटे तीनला १००% क्षमतेने ओव्हरफ्लो झालं. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे धरण जलाशय भरून वाहू लागला असून प्रवरा नदीपात्रात तब्बल १२,९२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ब्रेकिंग! भंडारदरा धरण फुल टँक – प्रवरेत १२,९२१ क्युसेकचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा ![⚠️]()
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी मानलं जाणारं भंडारदरा धरण बुधवारी (२० ऑगस्ट) पहाटे तीनला १००% क्षमतेने ओव्हरफ्लो झालं. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे धरण जलाशय भरून वाहू लागला असून प्रवरा नदीपात्रात तब्बल १२,९२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसाची बॅटिंग
मंगळवारी संध्याकाळपासून कळसूबाई परिसरासह धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. परिणामी नवीन पाण्याची मोठी आवक होऊन धरण क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचलं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी योगेश जोर्वेकर आणि प्रवीण भांगरे यांच्याकडून पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नागरिकांसाठी इशारा
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये प्रवरेला पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते.
इतर धरणांची स्थिती
- निळवंडे धरण : ९१.५५% भरलं असून ९,७२९ क्युसेक विसर्ग सुरू
- मुळा धरण : ८४% क्षमतेपर्यंत भरलेलं, पाणीसाठा झपाट्याने वाढतोय
गत २४ तासांचा पावसाचा हिशोब
- भंडारदरा – १०१ मिमी
- घाटघर – १६० मिमी
- पांढरे – १०५ मिमी
- वाकी – १०२ मिमी
- रतनवाडी – तब्बल १७० मिमी (सर्वाधिक)
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण आहे.
ही बातमी अधिकाधिक शेअर करा!
तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा!
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात जलद ब्रेकिंग अपडेट्ससाठी Metro News फॉलो करा!