BREAKING | नालेगाव हल्ला प्रकरणात मोठी कारवाई!

घरात घुसून धारदार हल्ला – ‘पीपी गँग’चे 4 जण अटकेत, 3 दिवसांचा रिमांड!

⚡
BREAKING | नालेगाव हल्ला प्रकरणात मोठी कारवाई!

घरात घुसून धारदार हल्ला – ‘पीपी गँग’चे 4 जण अटकेत, 3 दिवसांचा रिमांड!

📍 अहिल्यानगर:
नालेगाव परिसरात दिल्ली गेटजवळ 24 जुलै रोजी घडलेल्या थरारक मारहाणीच्या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘पीपी गँग’शी संबंधित चार आरोपींना अटक करून पोलीस कोठडी मिळवण्यात यश आलं आहे.

👨‍⚖️ कोर्ट नंबर 22 मध्ये सुनावणी
चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दीपाली एन. मेहेत्रे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. फिर्यादी रोहन जयेंद्र चव्हाण यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिजीत पुप्पाल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कोर्टाने पोलीस व सरकारी वकीलांचं म्हणणं मान्य करत 3 दिवसांची रिमांड मंजूर केली.

🔴 घटनेचा थरार:
फिर्यादी रोहन चव्हाण यांच्या कुटुंबावर घरात घुसून लाकडी दांडके व धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. अनेक सदस्य गंभीर जखमी झाले.

👥 या आरोपींवर आधीही गुन्हे!
पोलिसांनी प्रशांत दळवी, गणेश भुजबळ, हर्षल सारसर आणि किरण झरे यांना अटक केली आहे.
पवन पवार, शिवम पवार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून ते ‘पीपी गँग’ च्या नावाने परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

📸 घटनेचा मूळ वाद काय?
22 जुलै रोजी गँगच्या काही सदस्यांनी डीजे लावून रस्ता अडवला होता, वाहन चालकांशी हुज्जत घातली. त्याचे चित्रीकरण रोहन चव्हाण यांनी केल्याने, आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच रागातून 24 जुलै रोजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

⚖️ IPC कलमं:
आरोपींवर IPC 109 (1), 126 (2), 118 (1), 189, 191, 190, 333, 324 (4)(5) इत्यादी अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🚨 पोलिसांची भूमिका ठाम!
तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत एकामागून एक अटकसत्र सुरू केलं असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.