BREAKING | पैशांपायी थेट मर्डर अटेंप्ट! संगमनेरमध्ये अल्पवयीनाचं थरारक कृत्य

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने थेट डोक्यात दगड मारून माणूस मारण्याचा

🔴
BREAKING | पैशांपायी थेट मर्डर अटेंप्ट! संगमनेरमध्ये अल्पवयीनाचं थरारक कृत्य 😱

📍 संगमनेर | परदेशपुरा

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने थेट डोक्यात दगड मारून माणूस मारण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना संगमनेरमध्ये घडली आहे. 😨

👨‍🔧 जखमी व्यक्ती – सुहास वाघमारे (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात तंत्रज्ञ) हे रात्री साडे १२ च्या सुमारास परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोरून जात असताना, नशेत बुडालेल्या अल्पवयीन मुलाने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले.

❌ वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर रागावलेल्या अल्पवयीनाने, आधी त्यांना मारहाण केली आणि नंतर जमिनीवर पाडून डोक्यात दगडाचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकलं! 💥🧱🩸

👀 संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद!
पोलिसांनी दारू दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी तरुण दगडाने डोक्यात घाव घालताना स्पष्ट दिसतो.

🚨 या अल्पवयीन गुन्हेगारावर आधीपासून गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे.

🛑 सवाल असा की, अल्पवयीनांच्या हातात इतकी क्रूरता कुठून येतेय? ‼️
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

📲 ही बातमी शेअर करा – समाजाला जागं करा!