ब्रेकिंग न्यूज – अहिल्यानगरमध्ये तलाठी लाच घेताना अडकला, एसीबीची यशस्वी सापळा कारवाई! 

अहिल्यानगर जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे

🔥
 ब्रेकिंग न्यूज – अहिल्यानगरमध्ये तलाठी लाच घेताना अडकला, एसीबीची यशस्वी सापळा कारवाई! 🔥

अहिल्यानगर जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाथर्डी तालुक्यातील आडगाव सजा येथील तलाठी सतीश धरम याने ५० हजार रुपयांची लाच घेताना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. ही कारवाई एसीबीच्या टीमने 31 जुलै 2025 रोजी केली असून, सोशल मीडियावर सध्या ती जोरदार व्हायरल होतेय.

काय आहे प्रकार?

तक्रारदार युवक (वय 26) याच्या वडिलांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते. घरकुलासाठी मुरूम व वाळू आणताना त्यांनी चुलत भावाच्या जेसीबी व मित्राच्या ट्रॅक्टरचा वापर केला होता. तलाठी सतीश धरम व नायब तहसीलदार सानप यांनी रात्री निरीक्षण करून अवैध गौण खनिज वाहतुकीचा आरोप करत कारवाई न करण्यासाठी तब्बल ५०,००० रुपयांची लाच मागितली.

ही लाच तलाठी धरम याने स्वतः स्वीकारून ती रक्कम खाजगी इसम अक्षय घोरपडे (वय 27, शेतकरी) याच्याकडे सुपूर्त केली. तक्रारदाराने तात्काळ एसीबीकडे तक्रार केली आणि पोलिस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

पोलिस कारवाई व पुढील तपास

दोघा आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सध्या पुढील चौकशी जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.

टीम मागे कोण?

या कारवाईत रवी निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख या पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. ही मोहीम पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

➡️ अहिल्यानगरकरांनो, भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा ठोका – “लाच दिली तर शिक्षा, घेतली तर तुरुंग!” 💥

#ACBTrap #CorruptionFreeIndia #AhalyanagarNews #BreakingNews #PMAY #NoMoreBribe #SocialJustice