BREAKING: रेशनचा काळाबाजार उघड! 70 क्विंटल तांदूळ जप्त!
अकोले तालुक्यात मोठा प्रकार समोर आला आहे! खेतेवाडी आणि मोरवाडी गावांसाठी रेशनचं धान्य घेऊन जाणाऱ्या



अकोले तालुक्यात मोठा प्रकार समोर आला आहे! खेतेवाडी आणि मोरवाडी गावांसाठी रेशनचं धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील 70.40 क्विंटल तांदूळ परवान्याविना अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात उतरवण्यात आला 
सामाजिक कार्यकर्ते – संदीप शेणकर, सचिन शेटे, नितीन नाईकवाडी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार रंगेहाथ पकडण्यात आला!
ट्रककडे होता फक्त ‘पास’, पण गोदामपालाची सही असलेला अधिकृत परवाना नव्हता. म्हणजेच रेशनचा माल चोरीच्या तयारीत होता!
पुरवठा निरीक्षक संदीप निळे आणि पोलीस घटनास्थळी दाखल; चौकशी करत धान्य जप्त केलं आणि पंचनामा करण्यात आला.
मार्चचं धान्य जुलैमध्ये आणलं जात होतं, त्यावर परमीटही नाही! पुरवठादार कोणताही विश्वासार्ह खुलासा देऊ शकला नाही 
नागरिकांच्या जागरूकतेमुळे गरीबांसाठी असलेलं रेशन काळ्या बाजारात जाण्यापासून वाचलं!
आता समाज म्हणतोय – “गुनहगारांवर कडक कारवाई करा!”