BREAKING: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष काळं फासले! शिवप्रेमींचा संताप उसळला!
अक्कलकोटमध्ये आज एक मोठी घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींनी थेट काळं फासलं!
प्रवीण गायकवाड फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना, शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली.
कारण काय?
‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘स्वामी समर्थ’ यांचा एकेरी उल्लेख केल्याचा संताप!
गायकवाड यांना काळं फासल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शिवधर्म फाउंडेशनने आधीच दिला होता इशारा – जर ‘संभाजी’ महाराजांचा अपमान केला, तर रस्त्यावर फिरू देणार नाही!
आता पुढचं काय?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनासमोर मोठा मोर्चा!
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर – या भागातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार!
ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, युवकांमध्ये संतापाचं वातावरण आहे!