BREAKING UPDATE | अहिल्यानगर जिल्ह्यात 12 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी सदस्य संख्या आणि आरक्षण निश्चित!
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अहम निर्णय घेतला आहे – अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी सदस्य संख्या आणि आरक्षणाचा तपशील राजपत्रात जाहीर करण्यात आला आहे.

सर्वाधिक सदस्यसंख्या श्रीरामपूर – 34 सदस्य
सर्वात कमी सदस्यसंख्या नेवासे – 17 सदस्य
निवडणूक होणाऱ्या 12 ठिकाणी यंदा बदललेली आकडेवारी:
श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी आणि नेवासे नगरपंचायत.
प्रभाग रचना टाइमलाइन:
22 ते 28 ऑगस्ट – प्रारूप प्रभाग रचना (हरकतीसाठी जाहीर)
3 ते 6 ऑक्टोबर – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध
काही ठळक मुद्दे:
- जामखेडमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रथमच
- शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर – नवीन आरक्षण लागू
- काही जागांवर महिला राखीव असेल का हे सोडतीद्वारे निश्चित होणार
- आरक्षण रचना: अनुसूचित जाती, जमाती, महिला व सर्वसाधारण यांचं अचूक नियोजन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला आता वेग!
पुढचा टप्पा – प्रभाग रचना आणि अंतिम अधिसूचना