ब्रेकिंग! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – 9 सप्टेंबर रोजी होणार मतदान!
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशातच मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशातच मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देत राजीनामा दिला आणि त्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आता नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.
9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी अधिसूचना जाहीर होणार असून 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 25 ऑगस्ट शेवटचा दिवस असेल.
मतदानासाठी वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्यांसाठी असते.
सध्या दोन्ही सभागृहात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए कडे बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी बाजूला फार अडचण येण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाते, हे पाहणं सगळ्यांसाठीच उत्सुकतेचं ठरणार आहे.
देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या constitutional पदासाठीची ही निवडणूक आता चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर याचे अपडेट्स सतत येत असून, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
#VicePresidentElection #BreakingNews #MetroPortal #IndiaPolitics #Election2025 #JagdeepDhankhar #NewVP