“खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी झालीच पाहिजे!” – चित्ते कुटुंबाची मुख्यमंत्री शिंदेंकडे थेट मागणी!

श्रीरामपूरचे भाजपचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्यावर दाखल झालेल्या कथित बनावट अॅट्रॉसिटी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या पत्नी दिपाली चित्ते आणि मुलगा प्रतीक चित्ते यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

🛑
 “खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी झालीच पाहिजे!” – चित्ते कुटुंबाची मुख्यमंत्री शिंदेंकडे थेट मागणी!

📍 मुंबई | श्रीरामपूर | पोलीस न्यूज नेटवर्क

श्रीरामपूरचे भाजपचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्यावर दाखल झालेल्या कथित बनावट अॅट्रॉसिटी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या पत्नी दिपाली चित्ते आणि मुलगा प्रतीक चित्ते यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

📌 मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात निवेदन सादर करताना चित्ते कुटुंबाने थेट आरोप केला की, “हे प्रकरण पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. सत्य बाहेर येणं आवश्यक आहे!”

✍️ दिपाली चित्ते म्हणाल्या –
“रात्री ७.४५ वाजता दिलेल्या मूळ तक्रारीत प्रकाश चित्ते यांचं नावच नव्हतं, पण नंतर रात्री १ वाजता दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत काल्पनिक जातीय आरोप केले गेले. हे स्पष्टपणे पूर्वनियोजित कटकारस्थान वाटतं!”

🔍 प्रतीक चित्तेचा आरोप –
“कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला! पोलीस राजकीय दबावाखाली काम करतायत का?”

📣 चित्ते कुटुंबाची मागणी –

  • प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे
  • दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
  • खोट्या गुन्ह्याचा पडदा फाटला पाहिजे!

🤝 मुख्यमंत्री शिंदेंनी निवेदन स्वीकारत आश्वासन दिलं –
“योग्य तपास केला जाईल!”

🚨 या प्रकारामुळे प्रकाश चित्ते समर्थकांत संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी राजकीय हातचं बाहुलं बनू नये, हीच सध्या शहरातली प्रमुख मागणी!