नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची जयंती उत्साहात साजरी

भजन, किर्तन कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध

शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात नामदेव शिंपी समाज उन्नती ट्रस्टच्या वतीने संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची 751 वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी मयुर महेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी तसेच नामदेव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. पूजेनंतर ह.भ.प. भाबड महाराज, संजय काळे महाराज, राऊत गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भजनी मंडळाचा भजन, किर्तनाचा कार्यक्रम रंगला होता. या भजन, किर्तन कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी सुश्राव्य भावगीत व भक्तीगीते सादर करण्यात आली.सनई, चौघड्यांच्या निनादात ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी जयंती कार्यक्रमासाठी बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली (मामा) गायकवाड, हरीभाऊ डोळसे, जालिंदर बोरुडे, संजय उद्मले, महेश कांबळे, सुभाष नागुल, बाबुराव दळवी, नितीन पवार, प्रशांत वाघचौरे, श्याम औटी, राजेश सटाणकर, अनिल इवळे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते

हे ही पहा आणि सबस्क्राईब  करा .

 

श्रीकांत मांढरे यांनी नामदेव महाराजांची भक्ती व वारकरी संप्रदायाची महती आपल्या भाषणात सांगितली. यावेळी ट्रस्टचे सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गिते, संचालक ज्ञानेश्‍वर कविटकर, भिंगार नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे, निळकंठ देशमुख, अरुण जवळेकर, अजय कविटकर, प्रसाद मांढरे, अशोक जाधव, महेश जाधव, रविंद्र गिते, शोभा गिते, कल्पना जाधव, माधवी मांढरे, स्मिता गिते आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त मंदिरास फुलांची सजावट करुन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………....

 

 


शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात नामदेव शिंपी समाज उन्नती ट्रस्टच्या वतीने संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची 751 वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गिते, संचालक ज्ञानेश्‍वर कविटकर, भिंगार नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली (मामा) गायकवाड, हरीभाऊ डोळसे, जालिंदर बोरुडे, संजय उद्मले, महेश कांबळे, सुभाष नागुल, बाबुराव दळवी, नितीन पवार, प्रशांत वाघचौरे, श्याम औटी, राजेश सटाणकर, अनिल इवळे, निळकंठ देशमुख, अरुण जवळेकर, अजय कविटकर, प्रसाद मांढरे, अशोक जाधव, महेश जाधव, रविंद्र गिते, शोभा गिते, कल्पना जाधव, माधवी मांढरे, स्मिता गिते आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)