मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय ‘लाईफलाइन’! – 6 महिन्यांत 587 रुग्णांना मिळाली 4.90 कोटींची मदत!

"पैसा नसल्यामुळे उपचार थांबणार नाही!"

🏥
 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय ‘लाईफलाइन’! – 6 महिन्यांत 587 रुग्णांना मिळाली 4.90 कोटींची मदत!

📍 अहिल्यानगर | दिनांक – 16 जुलै 2025


“पैसा नसल्यामुळे उपचार थांबणार नाही!”
महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीने गरजू रुग्णांसाठी अक्षरशः जीवनदायी हात दिला आहे.


🔴 काय आहे ह्या निधीचं महत्व?

2025 मध्ये सहा महिन्यांत 587 रुग्णांना ₹4 कोटी 89 लाख 93 हजार रुपयांची मदत देण्यात आली!
विशेष म्हणजे 1 मे 2025 पासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू झाल्यानंतर मदतीचं प्रमाण तब्बल चारपट वाढलं!


💉 कोणत्या आजारांसाठी मदत मिळते?

✅ कर्करोग
✅ हृदयविकार
✅ मेंदूविकार
✅ नवजात बालकांचे गंभीर आजार
✅ मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण
✅ अपघातातील शस्त्रक्रिया
✅ महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया


📊 महिन्यानुसार मदत (2025):

महिना रुग्णसंख्या मदतीची रक्कम
जानेवारी 32 रुग्ण ₹24.65 लाख
फेब्रुवारी 28 रुग्ण ₹22.75 लाख
मार्च 43 रुग्ण ₹32.25 लाख
एप्रिल 29 रुग्ण ₹24.70 लाख
मे 32 रुग्ण ₹24.65 लाख
जून 320 रुग्ण ₹2.73 कोटी
जुलै (13 तारखेपर्यंत) 103 रुग्ण ₹87.30 लाख

📝 अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रं:

🗂️

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • रुग्ण दाखल असल्याचे जीओ टॅग फोटो
  • उपचार खर्चाचे अंदाजपत्रक
  • जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणपत्र (खासगी हॉस्पिटलसाठी)
  • तहसीलदार उत्पन्न दाखला (₹1.6 लाखापेक्षा कमी)
  • आधार कार्ड
  • निदान अहवाल
  • अपघात असेल तर एफआयआरप्रत्यारोपण असेल तर समिती अहवाल

📍 अर्ज कुठे जमा करायचा?
मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर – दुसरा मजला
किंवा
📧 ईमेल: [email protected]


🔗 Online अर्जाची स्थिती पाहण्यासाठी:
👉 https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action