दिल्लीगेट परिसरात दोन गटांत हाणामारी!  दगडफेक, तोडफोड, जखमी अनेक!

अहिल्यानगर – गुरुवारी (24 जुलै) दुपारी दिल्लीगेटजवळील म्युन्सिपल कॉलनीत जोरदार राडा झाला! पूर्ववैमनस्यातून दोन गट समोरासमोर आले आणि हाणामारीने रौद्ररूप धारण केले.

🚨
 दिल्लीगेट परिसरात दोन गटांत हाणामारी! 🪓 दगडफेक, तोडफोड, जखमी अनेक!

अहिल्यानगर – गुरुवारी (24 जुलै) दुपारी दिल्लीगेटजवळील म्युन्सिपल कॉलनीत जोरदार राडा झाला! पूर्ववैमनस्यातून दोन गट समोरासमोर आले आणि हाणामारीने रौद्ररूप धारण केले.

👊 पवार व रोहकले गटांमध्ये तुंबळ युद्ध!
• महिलांना बेधडक मारहाण
• तरुण जखमी
• वाहनांची जबरदस्त तोडफोड
• दुकानांवर दगडफेक!

👁️‍🗨️ घटना सीसीटीव्हीत कैद!
दुपारी सुरू झालेली हाणामारी काही वेळातच बेकाबू झाली. आवाज, दगडफेक आणि गोंधळाने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.

🛑 पोलीसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

📣 थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं!
वादातील काही व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन थेट तक्रार दाखल केली. तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

⚠️ या घटनेमुळे दिल्लीगेट परिसरात तणावाचं वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली असून परिसरात आता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


 

🗯️ “जुन्या वादातुन हाणामारी झाली, पण सामान्य लोकांना त्रास होतोय!” – स्थानिक नागरिक