“साखर कारखान्यांमध्ये आता मक्यापासून इथेनॉल!”
राज्य सरकारचा मोठा निर्णय – धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला ग्रीन सिग्नल!



राज्य सरकारचा मोठा निर्णय – धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला ग्रीन सिग्नल!
आधी फक्त साखर, पाक, मळी आणि उसाच्या रसापर्यंत मर्यादित असलेली इथेनॉल निर्मिती
आता धान्यांपासूनही इथेनॉल बनणार – म्हणजे साखर कारखान्यांना वर्षभर उत्पादनाची संधी!
मक्याचे सोनं होणार!
कोरडवाहू शेतकऱ्यांना मक्याचे उत्पादन घेऊन इथेनॉलमधून नवीन कमाईचा रस्ता खुला!
इथेनॉलची मागणी वाढणारच –
पेट्रोलमध्ये 27%
डिझेलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट
⇒ केंद्र सरकारची तयारी सुरू!
कारखान्यांना करावी लागणार सुधारणा:
• स्वतंत्र धान्य साठवणूक
• योग्य विल्हेवाट व्यवस्था
• परवानग्या आणि पर्यावरण मानके पाळणे बंधनकारक
हे इथेनॉल फक्त इंधनासाठीच – पिण्यासाठी नाही!