मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून अंतिम झालेला नाही. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच त्यांच्यासमोर बंडखोरीचे संकट उभे राहिले आहे. अजित पवार गटाने यादी जाहीर करण्यापूर्वीच १७ आमदारांना एबी फॉर्म वाटले, त्यांच्या पक्षातही धुसफूस सुरु झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही मंगळवारी पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, बुधवारी शिंदे यांनी प्रमुख नेते व विद्यमान आमदारांची ‘वर्षा’ वर बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते एबी फॉर्म वाटप करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महायुतीत तिन्ही पक्षांचे मिळून 161 उमेदवार जाहीर झाले आहेत. अजून 127 उमेदवारांची यादी जाहीर होणे बाकी आहे.