सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढे ढकलल्या पावसामुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रात सलग मुसळधार पावसामुळे शेती, गावं, शहरं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक विस्कळीत, वीजपुरवठा खंडित आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.


सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढे ढकलल्या पावसामुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रात सलग मुसळधार पावसामुळे शेती, गावं, शहरं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक विस्कळीत, वीजपुरवठा खंडित आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं धडाकेबाज निर्णय घेत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत नो इलेक्शन!
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात स्पष्ट करण्यात आलंय की, निवडणूक प्रक्रियेत जेथे चिन्हवाटप झालंय किंवा कोर्टानं आदेश दिलेत, त्या संस्था वगळता उर्वरित सर्व ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.
याचा थेट अर्थ असा की, आता या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे.
आधीपासूनच पावसामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे.
राज्यभरातल्या पूरस्थितीला प्राधान्य देत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईपर्यंत राजकीय घडामोडींना ब्रेक लागला आहे.