अहमदनगर :
बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनायकराव देशमुख प्रचारात चांगलेच रमले आहेत. बिहार मध्ये प्रचार करता करता ते बिहारच्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या ताज्या मिठाईच्या प्रेमात रममाण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.