मंगेश कोरगांवकर यांचे अल्पशा आजाराने निधन

 

अहमदनगर : 

 

कुर्ला येथील रहिवासी असलेले मंगेश रघुनाथ कोरगांवकर (वय ७२) यांचे २८ ऑक्टोबरला बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाल आहे.

ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, सुन,नातवंडे असा परिवार आहे.

 

शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर यांचे ते थोरले बंधु होते. आपल्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाने ते नेहमीच लोकांच्या कायम स्मरणात राहायचे.  त्यांच्या जाण्याने समाजात मोठी हळहळ  व्यक्त होत आहे.