अहमदनगर जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण

बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

अहमदनगर: केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक  कोव्हिड-19 लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्या वतीने कोव्हिड -19 लसीकण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अहमदनगर  जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या हस्ते या अभियानास सुरुवात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेन्द्र बड़दे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अहमदनगरचे प्रभारी प्रचार अधिकारी पी,.फणिकुमार उपस्थित होते.

Also this and subscribe

 

 

 

 

 

 

 

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये जय हिन्द लोक क्ला मंच, शेवगाव आणि कुलस्वामिनी काला प्रतिष्ठान,अहमदनगर  यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत ,शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. कोव्हिड -19  आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना या जनजागृती अभियानातून दिली जाणार आहे.  तसेच एलईडी डिस्प्ले च्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

 पुढील दहा दिवस अहमदनगर  जिल्ह्यातील अहमदनगर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, संगमनेर, अकोले, कोपरगाव व  श्रीरामपुर  या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती श्री. फणीकुमार यांनी यावेळी दिली.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.