धरण उशाला अन् शेवगावकरांच्या घशाला कोरड!

१०-१२ दिवसातून एकदाच नळाला पाणी येतं – ही खरी परिस्थिती आहे!

🚨
BREAKING | धरण उशाला अन् शेवगावकरांच्या घशाला कोरड! 🚰

शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण सुरू आहे! 🌞💧 जायकवाडी धरणात पाणी साठा मुबलक असूनही शेवगावकरांना आठवड्याला पाणी मिळावं, यासाठी प्रतीक्षा करावी लागते. १०-१२ दिवसातून एकदाच नळाला पाणी येतं – ही खरी परिस्थिती आहे! 😡

👉 कधी मोटार जळते, कधी बीज पुरवठा खंडीत होतो, तर कधी पाईपलाईन गळते… प्रत्येकवेळी नवीन कारण सांगून पाणीपुरवठा विस्कळीत केला जातो. दरवर्षी नगर परिषद नळपट्टी वसूल करते, पण पाण्याचा पुरवठा मात्र ठरल्याप्रमाणे होत नाही. 😠


💬 नागरिकांचा सवाल – जबाबदार कोण?
शहरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की –
➡️ आ. मोनिकाताई राजळे यांना या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
➡️ विरोधी पक्षाचे माजी आमदार घुले पाटील यांनीही कोणताच पुढाकार घेतलेला नाही.
➡️ जी.प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी निवडणुकीनंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

📢 लोक सांगतायत – विधानसभा निवडणुकीपूर्वी पाण्यासाठी आंदोलन करणारे नेते, आता मात्र गप्प का? 🤔


🔥 इतिहास थोडा आठवू या…

  • विधानसभा निवडणुकीआधी सौ. हर्षदाताई काकडे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन केलं होतं. महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. स्नेहलता फुंदे यांनीही तीव्र आंदोलन केलं होतं.

  • या आंदोलनाची दखल घेत आ. मोनिकाताई राजळे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली, निधीही मिळवला.

👉 पण… पाईपलाईनचे काम अजूनही कासवाच्या गतीने सुरू आहे. 🐢


😢 नागरिकांची व्यथा
दररोज पाण्यासाठी रांगा, त्रास, तडजोडी…
“धरण उशाला अन् घसा मात्र कोरडा” ही परिस्थिती शेवगावकरांची झाली आहे.


📣 सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया:
➡️ “नेते आंदोलन फक्त निवडणुकीपूर्वीच करतात का?” 😡
➡️ “जायकवाडीचं पाणी असताना शेवगाव तहानलेलं का?” 💧
➡️ “योजना मंजूर झाली, निधी मिळाला… मग पाईपलाईनचं काम इतकं मंद का?” 🤯


🚨 शेवगावकरांचा आक्रोश – आता हवा न्याय, नको दिखावा! 🚨
धरणात पाणी असूनही नागरिक तहानलेले राहणं ही शोकांतिका नाही तर प्रशासनाचं अपयश आहे.

#Shevgaon #WaterCrisis #MetroNews #Breaking