माणिकदौंडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा!

 १० जुगारी रंगेहात ताब्यात, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

💥
 माणिकदौंडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा!
🎲 १० जुगारी रंगेहात ताब्यात, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
📍 पाथर्डी | पोलीस न्यूज नेटवर्क अपडेट

जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घाडगे यांच्या विशेष पथकाने माणिकदौंड (ता. पाथर्डी) येथे आशिर पठाण यांच्या शेतात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली! धडाकेबाज कारवाईत १० जुगारी रंगेहात पकडले गेले असून सात वाहने, रोख रक्कम आणि मोबाईल्ससह एकूण ₹११,६१,५०० चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

🔍 गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने पत्र्याच्या शेडवर छापा टाकून, सट्टेबाजांना गाठलं! बलेनो गाडी, पाच मोटारसायकली, सात मोबाईल्स आणि रोख ₹४६,५०० असा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला.

🚔 विशेष पथकात सुनील पवार, दिनेश मोरे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, अजय साठे, दीपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे आणि अमोल कांबळे या पोलिसांनी मोलाचा सहभाग घेतला.

👮‍♂️ पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

🔥 पाथर्डी तालुक्यात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अशा अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई होत आहे, ही बाब अवैध धंदेवाल्यांना मोठा झटका ठरत आहे. सोशल मीडियावर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

🧨 “कायदा हातात घेतलास तर पोलिसांचा हात तुझ्या खांद्यावर लागणारच!” – अशी भावना आता अवैध व्यावसायिकांमध्ये दिसून येत आहे.