प्रेमविवाहाचं रूपांतर नरकात! अग्निशमन अधिकारी आणि कुटुंबीयांविरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा

 मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास – अखेर महिलेचा पोलिसांकडे आधार

🚨
 प्रेमविवाहाचं रूपांतर नरकात! अग्निशमन अधिकारी आणि कुटुंबीयांविरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा
💔 मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास – अखेर महिलेचा पोलिसांकडे आधार

📍 अहिल्यानगर | पोलीस न्यूज नेटवर्क अपडेट

शहरातील अग्निशमन विभागातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात विवाहितेच्या छळाचा धक्कादायक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. 2018 साली प्रेमविवाह करून सुरू झालेला संसार, आता अत्याचाराची कहाणी बनला!

📝 पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मे 2024 ते जून 2025 दरम्यान मुंबईत वास्तव्यास असताना, पती भरत मिसाळ याने वारंवार मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दारूच्या नशेत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याशिवाय, सासरच्या मंडळींनी तब्बल ₹5.5 लाखांची मागणी करत सतत माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकला.

👨‍👩‍👧‍👦 आरोपींमध्ये – पती भरत शंकर मिसाळ, सासरे शंकर उत्तम मिसाळ, सासू कमल शंकर मिसाळ आणि ननंद धनश्री शंकर मिसाळ यांचा समावेश आहे. सर्वजण नालेगाव, म्युन्सिपल कॉलनी, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.

 

🚨 अत्याचाराने थकलेल्या विवाहितेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला असून शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.