



Breaking Update for Farmers! हवामान आधारित फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे! आता ३ ते ६ जुलै २०२५ दरम्यान अर्ज करता येणार आहे.
याआधी शेवटची तारीख ३० जून होती, पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आला नाही. आधार पोर्टलवरील समस्यांमुळे त्रास झाल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे.
कोणकोणत्या पिकांसाठी आहे विमा?
- द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी
मृग बहार २०२५ साठी लागू
अर्ज कसा करायचा?
- www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
- अर्ज करताना Farmer ID अनिवार्य आहे
अजून Farmer ID काढलेला नसेल?
- काळजी नको! वेबसाइटवरून सहज करता येईल रजिस्ट्रेशन
टीप: केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे ही योजना शक्य झाली आहे. ही संधी गमावू नका – आजच अर्ज करा!
ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये, स्टेटसवर आणि पेजवर शेअर करा – जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही! #FasalBima #FarmerUpdate #AgriNews #MetroNewsAgriculture