सेवा ज्येष्ठता असूनही शिक्षक पगारापासून वंचित….

समता शिक्षण प्रसारक मंडळाचे आमरण उपोषण

अहमदनगर  
नेवासेमधील समता शिक्षण प्रसारक मंडळाने  शाळेतील तीन शिक्षकांचे पगार गेल्या तीन वर्षांपासून थकवले आहेत. ते तत्काळ परत द्यावेत तसेच बेकायदेशीर बदल्या रद्द कराव्यात  या मागणीसाठी  संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच  आणि शिक्षकांनी नगरच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर  आमरण उपोषणाला सुरुवात केलीय.

 

समता शिक्षण प्रसारक मंडळा संस्थेचे अध्यक्ष हे संस्थेचे पूर्वाश्रमीचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पदाला मान्यता न घेता त्यांना संस्थेने राबवून घेतले. आणि नंतर संस्थेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापक कुऱ्हे यांना अध्यक्ष केले, आणि नवीनच वाद वाढवून ठेवला. आणि त्यांच्या जागेवर एटीडीएएम सेवा कनिष्ठ शिक्षक नामदेव ससे यांची नियुक्ती केली जी बेकायदेशीर आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होती. या बद्दल तक्रारी झाल्यांनतर शिक्षण विभागाच्या  विभागीय उपसंचालकांनी हि मान्यता रद्द केली. आता कुऱ्हे यांचा वाद औरंगाबाद  खंडपीठाकडे गेलाय.

 

 

हे ही अवश्य पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा 

 

 

 

 

अशाच प्रकारची चारपाच प्रकरणे असून त्यामुळे तीन शिक्षकांना अद्याप सेवा ज्येष्ठता असूनही पगारापासून वंचित राहावे लागले. शिक्षण विभागाने या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करावी आणि अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या आंदोलनद्वारे करण्यात आली.  आंदोलकांनी दिलेल्या निवेदनावर समता  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ कुऱ्हे, सेक्रेटरी जयवंत लिपाने , बन्सी म्हस्के, सुभाष शिंदे, भरात फाटके, आबासाहेब फाटके, सुनीता लिपाने, माजी शिक्षक पांडुरंग कुऱ्हे, मंदाकिनी म्हस्के, श्रीमती चिंधे, रमेश घुले, विक्रम म्हस्के आदींच्या सह्या आहेत.