अवैध वाळू तस्करांवर उपअधीक्षक संतोष खाडे यांची धडक कारवाई!
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे दिवस जवळ आलेत, कारण पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचं ऑपरेशन मोड “ऑन” झालं आहे! नगर एमआयडीसी हद्दीतील नांदगाव परिसरात के.के. रेंजजवळ अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच खाडे सरांनी थेट मध्यरात्री आपल्या टीमसह तळ ठोकला.

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे दिवस जवळ आलेत, कारण पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचं ऑपरेशन मोड “ऑन” झालं आहे!
नगर एमआयडीसी हद्दीतील नांदगाव परिसरात के.के. रेंजजवळ अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच खाडे सरांनी थेट मध्यरात्री आपल्या टीमसह तळ ठोकला.
पहाटेच्या सुमारास चार डंपर आणि कामगार वाळू उपसायला पोहचताच पोलिसांनी टाकला धाडसी छापा.
या कारवाईत चार डंपर, आठ ब्रास वाळू असा सुमारे 61 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत उपअधीक्षक खाडे यांच्यासोबत उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांच्या पथकाचे योगदान लक्षणीय ठरले.
ही सगळी मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
संतोष खाडे हे त्यांच्या प्रशिक्षण काळातच एकामागून एक धडाकेबाज कारवाया करत आहेत.
मटका, गुटखा, दारू विक्री, जुगार अड्डे आणि आता वाळू माफियांवरही त्यांनी चढवलेलं शड्डूगं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
“अहिल्यानगरच्या सिंघम” म्हणून ओळखले जाणारे खाडे सर सध्या अवैध व्यावसायिकांचे काळजाचं ठोकार ठरत आहेत.
जिथे खाडे तिथे धाड! अशी टॅगलाईनच व्हायरल होत आहे.