‘सगेसोयरे’ ना नाही आरक्षण! सरकारचा यु-टर्न?
मनोज जरांगे-पाटील यांची एक मोठी मागणी सरकारने स्पष्टपणे फेटाळली आहे.
‘सगेसोयरे’ ना नाही आरक्षण! सरकारचा यु-टर्न?
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन पेटवणारे मनोज जरांगे-पाटील यांची एक मोठी मागणी सरकारने स्पष्टपणे फेटाळली आहे. मातृसत्ताक पद्धतीने नाते असलेल्या – आत्या, मावशी, आजी यांना ‘सगेसोयरे’ व्याख्येत धरून कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणाचा लाभ द्यावा – या मागणीवर राज्य सरकारनं स्पष्ट ‘नकार’ दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जरांगेंच्या आंदोलनाच्या दबावाखाली एकनाथ शिंदे सरकारने याबाबत प्रारूप अधिसूचना काढली होती आणि हरकती-सूचना मागवल्या होत्या. पण आता हजारो हरकती आल्यानंतर सरकारने ती अधिसूचना थेट थंडबस्त्यात टाकली आहे.
राज्य सरकारच्या वतीने स्थापन झालेल्या न्या. संदीप शिंदे समितीने चार अंतरिम अहवाल दिले असून, त्यातही या मागणीला कायदेशीरदृष्ट्या मान्यता नाकारण्यात आली आहे. “मातृसत्ताक नात्यांना आरक्षणाचा लाभ देता येणार नाही,” असं स्पष्ट मत शिंदे समितीने मांडलं असून सरकारनेही ते मान्य केलंय.
यामुळे आत्या-मावशीकडून कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही, यावर आता मोठा ‘NO’ आला आहे.
केंद्राच्या कायद्यानुसार फक्त पितृसत्ताक रक्त नाते हेच पात्र धरलं जातं.
जरांगे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पण सरकारचा स्टँड क्लिअर आहे — “सगेसोयरेंना आरक्षण नाही!”
#MarathaReservation #KunniCertificate #ManojJarange #SagesoyreIssue #MetroUpdate #YouthNews
