अॅग्रो टुरिझम विश्वच्या नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण !
पुणे :
अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अॅग्रो टुरिझम विश्व टीमचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते. अॅग्रो टुरिझम विश्वने कृषी पर्यटनाला एक वेगळी ओळख कशी करून दिली आहे तसेच इतर कार्य आणि सेवा विषयी गणेश चप्पलवार यांनी खासदार कोल्हे यांना सांगितलं आहे.
बदल ही काळाची गरज आहे. अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगो अर्थपूर्ण आहे. त्यात आभाळ, पक्षी, डोंगर, शेती, पीक, नागरणी करताना शेतकरी, झाडं, शेतातील घर, छोटे पर्यटक, बैलगाडी, जनावरांसह, कृषी व ग्रामीण पर्यटन सल्लागार, मजकूर लेखन, डाक्युमेन्ट्स – फिल्म, शुट – फोटोग्राफी, मुलाखत, कृषी व ग्रामीण सहल, कृषी पर्यटन कार्यशाळा, प्रमोशन, मार्केटिंग, ब्रॅन्डींग, जाहिराती, वेबसाईट, सर्व प्रकारचे मिडिया वर्क, सोशल व डिजिटल माध्यमाचे सेवांची प्रतिबिंब दिसते. आम्ही फक्त कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि इको टुरिझमसाठीचं काम करतो. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम हे आपल्या अॅग्रो टुरिझम विश्वचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यला अनुसरून गेल्या तीन वर्षापासून काम करत असल्याचे गणेश चप्पलवार यांनी सांगितलं आहे.