डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण बाबत मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न!

२० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभा राहणार!

अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा समितीच्या वतीने आज पूर्ण कृती पुतळा अनावरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी समितीचे अधिकृत समितीच्या सभासदांची यादी आयुक्तांना सुपूर्द करण्यात आली यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा समितीचे सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, संजय कांबळे, किरण दाभाडे, योगेश साठे, सुनील शिंदे, संजय जगताप, पोपट जाधव,  विलास साठे, डी.आर.जाधव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, जीवन कांबळे, विशाल कांबळे, दीपक अमृत, संजय साळवे, विशाल गायकवाड, चिकू गायकवाड, सिद्धार्थ राजगुरु, सागर ठोकळ, विजय गायकवाड, दिनेश पंडित, वैभव कांबळे, किरण गायकवाड, वैभव जाधव, विजय गव्हाळे, सिद्धांत कांबळे, अशोक खंडागळे, प्रवीण ओरे, शांतवणं साळवे आदीसह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आयुक्त यशवंत डांगे यांनी समितीच्या अधिकृत सभासदांच्या यादीला मान्यता देऊन पूर्ण कृती पुतळा अनवरणासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व अधिकृत कामे केले जाईल व मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण सोहळा येत्या २० मार्च ते १ एप्रिल दरम्यान पुतळा बसवण्यात येईल व या अनावरणासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व सन्माननीय मंत्री महोदय तसेच सर्व रिपब्लिकन नेते यांना देखील निमंत्रण देऊन पूर्ण कृती पुतळा अनवरणासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊन हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न करण्यात येणार आहे.