महाभकास आघाडीमुळेच आम्ही आरक्षणाला मुकलो….

ओ बी सी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर यशस्वी मोर्चा

अहमदनगर 

 

ओ बी सी समाजाचे हक्काचे आरक्षण परत द्यावे या मागणीसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.  महाभकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आले आहे त्यामूळेच आपण ओ बी सी आरक्षणाला मुकलो आहोत  असा आरोप यावेळी करण्यात आला.    याचाच निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने  नगर येथे आंदोलन करण्यात आले.

 

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदिप निचीत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार श्री बबनराव पाचपुते, आमदार  बालासाहेब मुरकुटे,जेष्ठ नेते अभय आगरकर,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष  प्रकाश चित्ते,ओबीसी प्रदेश सचिव  युवराज पोटे,ओबीसी शहर जिलाध्यक्ष ज्ञानेश्वर काले, संतोष रायकर आदी उपस्थित होते.   काही दिवसांपूर्वी माननीय  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, या संदर्भात आपल्या राज्य  सरकारने  पुनर्विचार याचिका दाखल केली होती . ही यााचिका सर्वोच्च  न्यायालयाने फेटाळली  परंतु,   राज्य  शासनाचे प्रमुख  आणि राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने  उद्धव ठाकरे यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि कार्यवाही केली नाही त्यामुळे याला सर्वस्वी महाविकास आघाडीचे नेतृत्वच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 

 

 

 

हे ही अवश्य पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा

 

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राज्य  सरकारला चेतावणी देत आहे की, लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा ! तसे झाले नाही तर  लाखोंच्या संख्येने  ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच गप्प बसू  जोवर आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.