वीज बिल थकलं? तर सावध! महावितरणकडून लागू नवे नियम – तिसऱ्या महिन्यात सुरक्षा ठेवेतून थकबाकी वसूल
महावितरणने वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून कडक नियम लागू
वीज बिल थकलं? तर सावध! महावितरणकडून लागू नवे नियम – तिसऱ्या महिन्यात सुरक्षा ठेवेतून थकबाकी वसूल
राज्यभरात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून कडक नियम लागू केले आहेत. आता दोन महिने सलग वीज बिल न भरल्यास, तिसऱ्या महिन्यात तुमच्या खात्यात जमा असलेल्या ‘सिक्युरिटी डिपॉझिट’मधून थकबाकी वळती केली जाणार आहे.
पूर्वी काय होतं?
ग्राहक दोन महिने बिल भरत नव्हते, तरी महावितरण फक्त नोटीस पाठवत होती. वीज कनेक्शन तात्पुरतं बंद केलं जात होतं, पण सिक्युरिटी ठेवेला हात लावला जात नव्हता. मात्र आता नियम बदलले आहेत.
नवीन नियम काय म्हणतो?

तिसऱ्या महिन्यात थकबाकी थेट सिक्युरिटी ठेवेतून वळती
नंतर ग्राहकाला ही ठेव पुन्हा भरावीच लागेल
शिवाय शिल्लक थकबाकीही भरणं बंधनकारक
नियम मोडल्यास वीज पुरवठा थांबवला जाईल
पुन्हा वीज जोडण्यासाठी ठेव + थकबाकी + नवीन जोडणी शुल्क भरावं लागेल
हा नियम मुंबईतील काही भाग सोडून संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.
तरुणांनो, हे लक्षात ठेवा – “बिल भरलं नाही, तर वीज नाही!”
स्मार्ट फोन चार्ज करायचा असेल, तर वेळेवर वीज बिल भरा. आता महावितरण थेट डिपॉझिटवर कारवाई करणार आहे. ही बातमी #वीजबिल #महावितरण #नवीननियम या हॅशटॅगसह शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या.