“आज दुश्मन, उद्या मित्र?” – उद्धव-शिंदे एकत्र येऊ शकतात का?

राजकारणात काहीही होऊ शकतं! हे फक्त म्हण नाही, तर महाराष्ट्रात रोजचं सत्य बनलंय.

🔥
 “आज दुश्मन, उद्या मित्र?” – उद्धव-शिंदे एकत्र येऊ शकतात का?

मुंबई | मेट्रो अपडेट

राजकारणात काहीही होऊ शकतं! हे फक्त म्हण नाही, तर महाराष्ट्रात रोजचं सत्य बनलंय. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही पुन्हा एकत्र येऊ शकतात, असं भुवया उंचावणारं विधान केलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी.

📍राज आणि उद्धव ठाकरे १८ वर्षांनी एकत्र मंचावर आले,
📍फडणवीस म्हणाले, “उद्धव सत्तेत यावेत”,
📍आता सरनाईक म्हणतात, “उद्धव-शिंदेही पुन्हा एकत्र येऊ शकतात!”

📸 धाराशिव दौऱ्यावर असताना टीव्ही ९ शी बोलताना सरनाईक यांनी सांगितलं की, राजकारणात ‘कोणीही कायमचा शत्रू नसतो’. आज जो एकमेकांकडे पाहत नाही, तो उद्या हसून मिठी मारू शकतो.

➡️ आदित्य ठाकरेंनी ‘भेटीच्या बातम्या बघून काही नेते गावाला जातील’ अशी टीका केली होती. यावर बोलताना सरनाईक म्हणाले, “भेटी होतच असतात. त्यातून राजकीय अर्थ काढणं चुकीचं.”

🗣️ त्यांनी आठवण करून दिलं की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळात उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचं ‘ऑफर’ दिलं होतं! “२०१९ पर्यंत आम्ही विरोधात येणार नाही, तुम्ही येऊ शकता” – असं ते म्हणाले होते.

राज-उद्धव यांची मिठी पाहून आता शिंदे-उद्धवचं भविष्यही ओपन असल्याचं सूचित झालंय.

💬 “राजकारणात काहीही होऊ शकतं – आज जे चित्र आहे, तेच उद्या असेल असं नाही!” – असं म्हणत सरनाईक यांनी सगळ्यांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच खाद्य दिला.


 

#PoliticalPlotTwist #UddhavShinde #RajUddhav #MetroNews #MaharashtraPolitics #SurpriseReunion?