भोर-संगमनेर पॉलिटिकल रणांगणात एन्ट्री! वैभव धाडवे पाटील व हर्षद बोबडे यांचा जोरदार टक्कर मूड!
वैभव धाडवे पाटील – पत्रकार ते जननेता प्रवास


भोर तालुक्यात सध्या एकच चर्चा – “या वेळी गटात बदल होणार का?” आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन दमदार चेहरे – मा. वैभवराजे धाडवे पाटील आणि हर्षद बोबडे सर. दोघांच्याही एन्ट्रीमुळे भोंगवली-संगमनेर गणातील राजकारणाला नवा ट्विस्ट आला आहे. 
वैभव धाडवे पाटील – पत्रकार ते जननेता प्रवास
शेतकरी पुत्र, निर्भीड पत्रकार आणि समाजसेवक अशी त्यांची ओळख. प्रशासनातील अन्यायावर त्यांनी धारदार लेखणी चालवली, तर गोरगरीब व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ते रस्त्यावर उतरले. आता ते जिल्हा परिषद सदस्यपदासाठी मैदानात उतरले असून, स्थानिक तरुणाई त्यांच्यामागे ठाम उभी आहे. 
विकास अजेंडा:
अपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण
प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीसह पाणीपुरवठा योजना
स्थिर व वेळेवर वीज पुरवठा, नवीन ट्रान्सफॉर्मर, जुन्या तारांची दुरुस्ती
गावातच रोजगार – कृषी आधारित उद्योग, लघुउद्योग, कौशल्य विकास केंद्रे
हर्षद बोबडे – शिक्षक ते सेवक
माजी सरपंच चंद्रकांत बोबडे यांचे सुपुत्र व व्यावसायिक शिक्षक असलेले हर्षद बोबडे हेही पंचायत समिती भोरसाठी इच्छुक. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून उमेदवारी मिळाल्यास तेही दमदार लढत देतील असा अंदाज. त्यांच्या कामात महिलांसाठी शिलाई मशिन वाटप, रोजगारवाढीचे प्रयत्न, रस्ते-लाईट सुधारणा, ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण लढा यांचा समावेश आहे. 
गावागावांत चाय पे चर्चा
कट्ट्यांवर जोरदार चर्चा – “यंदा चुरशीची लढत की एकतर्फी?” वैभव धाडवे यांच्या एन्ट्रीमुळे माजी सभापती, माजी सदस्यांच्या समीकरणात बदल झालाय. हर्षद बोबडे यांच्या इच्छुकतेमुळे ही लढत अधिक रंगतदार होणार हे नक्की! 
#भोरपॉलिटिक्स #संगमनेरअपडेट #Election2025 #VaibhavDhadave #HarshadBobade #YouthForChange 

तुमच्या मते कोण मारेल बाजी – धाडवे की बोबडे? 
